Best Bus Mumbai : लोकलचा 3 दिवस मेगाब्लॉक ! मुंबईकरांना ‘बेस्ट’ ची साथ, 486 अतिरिक्त बसफेऱ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Best Bus Mumbai : मध्य रेल्वे कडून 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. प्रदीर्घ मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणाऱ्या 930 लोकल ट्रेन सेवा गुरुवार-शुक्रवारी मध्यरात्रीपासून रविवार दुपारपर्यंत रद्द करण्यात आली आहे.मोठ्या प्रमाणात लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने दररोज कामानिमित्त मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र असे असताना बेस्ट (Best Bus Mumbai) कडून प्रवाशांचे हाल होऊ नये करिता खास नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता बेस्ट कडून शुक्रवारी तसंच शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून रविवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नियमित बस फेऱ्यांच्या व्यतिरिक्त अतिरिक्त बस सेवा (Best Bus Mumbai) चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच अतिरिक्त 55 बसच्या 486 फेऱ्या चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट कडून देण्यात आली आहे.

सध्या मुंबई आगारातील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे प्रवाशांची मागणी लक्षात घेता आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शनासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागा कडून देण्यात आलेली आहे. तर ब्लॉकमुळे (Best Bus Mumbai) राज्य परिवहन म्हणजेच एसटी महामंडळांना मुंबईतील कुर्ला नेहरूनगर परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी पन्नास जादा गाड्या चालवण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

1 जून रात्री साडे बारा ते 2 जून दुपारी 12.30 वाजेपर्यंत सेवा

बसमार्ग क्र. 1 सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व
बसमार्ग क्र. 2 लिमिटेड- कुलाबा आगार ते भायखळा स्थानक पश्चिम
एसी बस क्र. 10 कुलाबा आगार ते वडाळा स्थानक पश्चिम

  • एकूण 12 बसच्या (Best Bus Mumbai) 232 फेऱ्या

31 मे, 1 जून ते 2 जून दुपारी साडे तीन वाजेपर्यंत सेवा

बसमार्ग क्र. एसी 10 कुलाबा आगार ते वडाळा स्थानक पश्चिम
बसमार्ग क्र. 11 लि. सीएसएमटी ते धारावी आगार
बसमार्ग क्र. 12 डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी चौक ते प्रतीक्षानगर
बसमार्ग क्र. ए 45 बॅकबे आगार ते एमएमआरडीए वसाहत, माहुल
बसमार्ग क्र. 1 कुलाबा आगार ते खोदादाद सर्कल
बसमार्ग क्र. 2 लि. सीएसएमटी ते भायखळा स्थानक पश्चिम
बसमार्ग क्र. सी 42 राणी लक्ष्मी चौक ते दादलानी पार्क
बसमार्ग क्र. 2 लि. सीएसएमटी ते भायखळा स्थानक पश्चिम
बसमार्ग क्र. ए-174 अँन्टॉप हिल ते वीर कोतवाल उद्यान (प्लाझा)
एकूण 43 बसच्या (Best Bus Mumbai)254 बसफेऱ्या