बेस्ट प्रवासावर महागाईची झळ ; मुंबईकरांना दुप्पट भाडं मोजावं लागणार !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BEST Bus Ticket Prices: मुंबईच्या सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली BEST बस सेवा आता महागणार आहे. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाने तिकीट दर आणि मासिक पास दरांमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ आता अधिकृतपणे मंजूर झाली असून लवकरच अंमलात येणार आहे.

पालिकेचा शिक्कामोर्तब (BEST Bus Ticket Prices)

बेस्टच्या दरवाढीच्या प्रस्तावाला पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची मंजुरी मिळाली आहे. वाहतूक आणि नगरविकास विभागाच्या अंतिम मान्यतेनंतर नवीन दर लागू होतील. बेस्टला सध्या वर्षाला सुमारे 845 कोटींचा महसूल मिळतो, आणि भाडेवाढीनंतर हा आकडा 1400 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दरवाढीमागचं पार्श्वभूमी (BEST Bus Ticket Prices)

महाव्यवस्थापक एस. श्रीनिवास यांनी पदभार घेतल्यानंतर लगेच भाडेवाढीचं संकेत दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत बेस्ट प्रशासनाने भाडेवाढीवर ठाम भूमिका घेतली. अनेक संघटनांच्या विरोधानंतरही हा निर्णय अखेर मंजूर झाला.

नवीन भाडे दर (साध्या बस) (BEST Bus Ticket Prices)

अंतरजुने दरनवीन दर
5 किमी₹5₹10
10 किमी₹10₹15
15 किमी₹15₹20
20 किमी₹20₹30

वातानुकूलित (AC) बस भाडे

अंतरजुने दरनवीन दर
5 किमी₹6₹12
10 किमी₹13₹20
15 किमी₹19₹30
20 किमी₹25₹35

मासिक बस पास दर (साध्या बस)

अंतरजुना दरनवीन दर
5 किमी₹450₹800
10 किमी₹1000₹1250
15 किमी₹1650₹1700
20 किमी₹2200₹2600

मासिक AC पास दर

अंतरजुना दरनवीन दर
5 किमी₹600₹1100
10 किमी₹1400₹1700
15 किमी₹2100₹2300
20 किमी₹2700₹3500

नागरिकांचा आर्थिक बोजा वाढणार

महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता प्रवासासाठी आणखी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांवर आर्थिक ताण येणार आहे.