हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Hidden Places in Goa) उन्हाळा आला की, गोव्याला फिरायला जाण्याचे वेध लागतात. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी जागा म्हणजे गोवा. लांबलचक समुद्र किनारे, निळंशार पाणी आणि रोमांचक नाईटलाईफ एन्जॉय करायची असेल तर गोव्यासारखं दुसरं उत्तम ठिकाण नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी जीवाचा गोवा करायला हवाच. आजपर्यंत तुम्ही अनेकदा गोवाचं प्लॅनिंग केलं असेल. गोव्यातील अनेक ठिकाण तुम्ही एक्स्प्लोअर केली असाल. पण आज आम्ही तुम्हाला गोव्यातील अशा छुप्या ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत जिथले सौंदर्य न्याहाळताना तुम्हाला दिवस रात्र पुरणार नाही. चला तर गोव्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांविषयी लगेच जाणून घ्या.
चोरला घाट
गोव्यात फिरायला जाण्याचं प्लॅनिंग सुरु असेल तर चोरला घाटाला नक्की भेट द्या. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर वसलेलं ‘चोरला घाट’ हे पश्चिम घाटातील विलोभनीय, मनमोहक असे दृश्य दाखवणारे एक हिल स्टेशन आहे. (Best Hidden Places in Goa) इथला शांत आणि निवांत परिसर, आल्हाददायी वातावरण मनाला वेगळाच हर्ष देऊन जात. शहराच्या गजबजाटातून शांत आणि निवांत अनुभव देणार हे उत्तम ठिकाण आहे. येथे निसर्गासह तुम्ही ट्रेकिंगचा देखील लाभ घेऊ शकता.
अल्डोना गाव
उत्तर गोव्यातील ‘अल्डोना’ हे एक अत्यंत सुंदर, विलक्षण आणि मोहक गाव आहे. (Best Hidden Places in Goa) या गावात तुम्हाला गोव्याच्या स्थायिक लोकांची पारंपारिक जीवनशैली पाहता येईल. इथली घरे, परिसर आणि वातावरण अत्यंत स्वछंदी आहे. शिवाय स्थानिक बाजारपेठा, मंदिरे आणि चर्च भेट देण्यासारखी आहेत.
दिवार बेट (Best Hidden Places in Goa)
गोव्यातील ‘दिवार बेट’ तुम्हाला कदाचित माहित असेल. गोव्यात हे देखील एक छुपं रत्न आहे जे गोव्याचा अनोखा अनुभव देते. हे बेट मांडोवी नदीत वसले असून येथील नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेसाठी त्याची विशेष ओळख आहे. या बेटावर फेरीने फिरता येते. इथे नजीकच्या भागात जुनी पोर्तुगीज घरे, चर्च आणि चॅपल एक्सप्लोर करण्यासारखे आहेत.
अर्वालेम फॉल्स
गोव्यात संकेलिम या गावात ‘अर्वालेम फॉल्स’ नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. जिथे गेल्यावर इथला निसर्ग पाहून तुमचे डोळे दिपून जातील. हा एक सुंदर असा धबधबा आहे. (Best Hidden Places in Goa) जो सुमारे ५० मीटर उंचीवरून खाली कोसळतो. अत्यंत नयनरम्य दृश्य आणि मनमोहक वातावरणामुळे हे एक सुंदर आणि तितकंच उत्तम ठिकाण ठरत. झाडी, हिरवळ आणि शांत वातावरण यासह धबधब्याभोवतीचा परिसर पिकनिक स्पॉट म्हणून एक्स्प्लोअर करण्यासारखा आहे.
सालौलीम धरण
दक्षिण गोव्यातील सालौलीम धरण हे एक अत्यंत प्रभावी असे ठिकाण आहे. हे ठिकाण केवळ पाण्याचे स्त्रोत नसून येथील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. या धरणाच्या आजूबाजूला छोट्या मोठ्या टेकड्या आणि दऱ्या आहेत. (Best Hidden Places in Goa) त्यामुळे चित्तथरारक अनुभव घेता येतो. तसेच धरणाच्या शांत पाण्याचा शोध घेण्यासाठी येथे बोटीतून प्रवास करणे फारच आनंददायी आहे.
नेत्रावली अभयारण्य
गोव्यातील नेत्रावली वन्यजीव अभयारण्य हे एक अनोखे आणि अद्भुत अनुभव देणारे ठिकाण आहे. हे दक्षिण गोव्यात वसलेले भव्य असे अभयारण्य आहे. जिथे विविध वनस्पती आणि प्राणी विहार करतात. अगदी वाघ, बिबट्या आणि हत्ती यांसारखे प्राणी इथे राहतात. या अभयारण्यात ट्रेक करता येते. त्यामुळे हे अभयारण्य एक्स्प्लोअर करायला अजिबात विसरू नका. (Best Hidden Places in Goa)