हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Time to Walk) जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असेल तुमचा आहार उत्तम असायला हवा. यासोबत तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत व्यायामाचा समावेश हवाच. यामध्ये चालणे हा एक उत्तम व्यायाम मानला जातो. असे असले तरीही चालण्याची वेळ चुकल्यास त्याचा आरोग्यासाठी फायदा होत नाही. त्यामुळे चालण्याच्या वेळा पाळायला हव्यात. वाचून नवल वाटेल. पण आरोग्यदायी फायद्यांसाठी चालण्याच्या वेळा पाळणे आवश्यक असल्याचे तज्ञसुद्धा सांगतात.
अनेकांना वाटत की, मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळी चालणे आणि नाईट वॉक म्हणजे रात्री जेवणानंतर शतपावली करणे आरोग्यदायी असते. पण आज आम्ही तुम्हाला नेमकी कोणती वेळ चालण्याचा व्यायाम करण्यासाठी योग्य आहे? (Best Time to Walk) याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे चालण्याचा व्यायाम काही निश्चित वेळी करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. त्याविषयी जाणून घेऊया.
चालण्यासाठी कोणती वेळ चांगली? (Best Time to Walk)
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी चालण्याचे अनेक फायदे आहेत. कारण, या वेळेत झाडे ऑक्सिजन उत्सर्जित करत असतात. तसेच सकाळच्या वेळेत सूर्यप्रकाश आणि ताजी हवासुद्धा मिळते. मात्र, शहरामध्ये प्रदूषणाची वेळ समजणे जरा कठीण असते. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, हवेतील दूषित कण हे सकाळी आणि रात्री सर्वाधिक असतात. विशेषत: सकाळी ७ ते १० आणि रात्री ९ ते ११ या वेळेत भरपूर वायू प्रदूषण होते. तर दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रदूषण कमी होते. त्यामुळे या वेळेत वॉक घेता येईल.
(Best Time to Walk) तज्ञ सांगतात की, सकाळी आणि रात्री हवा शांत असते. त्यामुळे यावेळी प्रदूषण निर्माण करणारे दूषित कण हे हवेत अडकतात. यानुसार, संध्याकाळी सात-आठ वाजून गेल्यानंतर त्यांचे प्रमाण कमी होते आणि यावेळी हवेत श्वास घेणे सोपे होते.
शक्यता घरीच व्यायाम करा
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला सकाळी लवकर किंवा दिवसभर चालण्यासाठी वेळ मिळत नसेल तर घराबाहेर जाऊन व्यायाम करणे टाळा. त्यापेक्षा घरातल्या घरात सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. (Best Time to Walk) यामुळे बाहेरील वायूत असणारे दूषित कण तुमच्या आरोग्याचे नुकसान देखील करणार नाहीत. तरीही तुम्हाला बाहेर जाऊन व्यायाम करायचा असेल तर विशेष काळजी म्हणून एन९५ मास्कचा वापर करा.