Best Tourism Places In Monsoon | पावसाळ्यात महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट; मन होईल अगदी प्रसन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Best Tourism Places In Monsoon | पावसाळा आला की संपूर्ण निसर्गाचे चित्र बदलते. सर्वत्र हिरवाई दिसते. डोंगर दऱ्या, नदी,नाले सगळे ओसंडून वाहत असतात. त्याचप्रमाणे डोंगरावरून कोसळणारे शुभ्र दुधासारखे धबधबे, तर लोकांचे खास आकर्षण असते. त्यामुळे सगळेच लोक पावसाळ्यामध्ये (Best Tourism Places In Monsoon) निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा वेळ घालवतात. परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातील काही चांगल्या ठिकाणी फिरायला जायचे, असेल तर आधी त्या ठिकाणाबद्दल माहिती असणे खूप गरजेचे असते. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला कोण कोणत्या गोष्टींची गरज असते. त्यामुळे आज आपण महाराष्ट्रातील अशा काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही पावसाळ्यात जायलाच पाहिजे.

कोलाड | Best Tourism Places In Monsoon

Kolad

कोलाड हे महाराष्ट्रातील पावसाळ्यासाठी असलेले एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. मुंबई जवळ हे ठिकाण आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहे. या ठिकाणी विविध वनस्पती आहेत. त्याचप्रमाणे दुर्मिळ प्राणी आणि नैसर्गिक विविधता आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही पिकनिक किंवा कॅम्पिंग देखील प्लॅन करू शकता. तसेच या ठिकाणी जवळच गुहा, किल्ले आणि धबधब्याचा तुम्हाला मनमोहक आनंद घेता येईल.

इगतपुरी

Igatpuri

पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरण्यासाठी असणाऱ्या ठिकाणांपैकी इगतपुरी हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. हे ठिकाण पुण्याजवळ वसलेले आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. त्यामुळे पुण्याजवळ राहणाऱ्या लोकांना हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहे. इगतपुरी हे ठिकाणी निसर्गाला मिळालेले एक मोठे वरदानच आहे. निसर्गप्रेमी या ठिकाणी सातत्याने येत असतात. या ठिकाणी अनेक किल्ले आहेत डोंगर नद्या त्याचप्रमाणे डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहणे, म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या.

महाबळेश्वर

Mahabaleshwar

महाबळेश्वर हे मुंबई आणि पुणे या ठिकाणी असणाऱ्या रहिवाशी लोकांसाठी अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. महाबळेश्वर हे अगदी निसर्गाच्या सानिध्यात असल्याने त्या ठिकाणी आपल्याला दुर्मिळ असे प्राणी वनस्पती पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात महाबळेश्वरचे सौंदर्य हे आणखीनच खुलते. कारण डोंगरावरून वाहणारे धबधबे, त्याचप्रमाणे डोंगरावर आलेले आकाश या सगळ्या गोष्टी अगदी नयनरम्य असतात. या व्यतिरिक्त तुम्हाला ऐतिहासिक स्थळे देखील पाहायला मिळतील. तसेच ज्यांना ट्रेकिंग करायचे आहे. त्यांच्यासाठी महाबळेश्वर हे ठिकाण अत्यंत सोयीचे आहेत.

लोणावळा खंडाळा

Lonavala

पुणे- मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या घाट- माथ्यावर असलेले हे एक अत्यंत प्रसिद्ध असे ठिकाण आहे. लोणावळ्या आणि खंडाळा या ठिकाणी अनेक लोक जातात. या ठिकाणी तुम्हाला टायगर पॉईंट, लायन पॉईंट यांसारखी प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे इथे हिरवागार निसर्ग असतो. थंड हवा असते. तसेच डोंगरावरून कोसळणारे धबधबे, दाट धुके हे एक खास आकर्षण आहे. त्यामुळे पावसाळ्यात अनेक लोक लोणावळ्याला नक्की जातात.

भीमाशंकर | Best Tourism Places In Monsoon

Bhimashankar

महाराष्ट्रातील भीमाशंकर हे एक प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. आणि ते एक देवस्थान देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खास गहू गर्दी असते. कारण भीमाशंकरचे जंगल या ठिकाणी असलेले अभयारण्य, हिरवा निसर्ग, नद्या हे पर्यटकांना आकर्षित करत असतात. जंगल प्रेमी आणि ज्यांना ट्रेकिंग करायची आहे. त्यांच्यासाठी हे ठिकाण अत्यंत असे उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी संपदा देखील पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी बसून तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.