Best waterfalls in Satara : पावसाळा म्हटलं कि सर्वाच्याच आवडीचा महिना. त्यात रविवार असेल तर मग निसर्गरम्य ठिकाणांना भेट द्यायला कोणाला आवडणार नाही बरं. पाल्याच्या दिवसांत सह्याद्रीत फिरायला जाणं म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव असतो. आज आम्ही तुम्हाला सातारा जिल्ह्यातील टॉप १० धबधब्यांबद्दल सांगणार आहोत. या ठिकाणांना भेट दिल्यांनतर पुण्य मुंबईतील लोकांना स्वर्ग म्हणजे काय याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
ठोसेगर धबधबा (Thoseghar Waterfall)
महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांचा आवडता धबधबा म्हणजे ठोसेगर. जवळपास ५०० मीटर उंचीवरून इथे पाणी पडते. सातारा शहरापासून साधारण ४० किमी अंतरावर असलेल्या या धबधब्याला पर्यटकांची प्रथम पसंती मिळत असते. तुम्ही पुण्यावरून किंवा कराडच्या दिशेने येणार असाल तर शेंद्रे येथून तुम्हाला आतमध्ये वळावे लागते. चाळकेवाडी रस्त्यावर हा सुंदर धबधबा पाहताच क्षणी प्रत्येकाच्याच गाडीला ब्रेक लागतो.
वजराई धबधबा (Vajrai Waterfall)
महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच धबधब्यांपैकी एक असलेला वजराई धबधबा अनेकांना पावसाळ्यात आकर्षित करतो. कास जवळ असलेला हा धबधबा आल्या सौंदर्याने मोहित करून सोडतो. सातारा शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या वज्राची धबधब्याला तुम्ही एक दिवस खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकतो. सोबत तुम्ही कास पठारावरही आंनद घेऊ शकता.
लिंगमळा धबधबा (Lingmala Waterfall)
निसर्गप्रेमींसाठी फेव्हरेट डिस्टिनेशन असणारा लिंगमळा धबधबा ६०० फूट उंच आहे. सातारा शहरापासून ५६ किमी अंतरावर पाचगणी, महाबळेश्वर येथून जवळ असलेला हा धबधबा अफलातून आहे.
धोबी धबधबा (Dhobi Waterfall)
तुम्ही महाबळेश्वर, पाचगणी करत पावसाचा आंनद घेण्याकरता धोबी धबधब्याला भेट द्यायलाच हवी. सातारा शहरापासून ५८ किमी आणि पुण्यापासून १२१ किमी अंतरावर असलेला हा धबधबा प्रेमी युगुलांसाठी आवडीचे ठिकाण आहे. विशेष म्हणजे धोबी धबधबा कोयना अभयारण्य परिसरात असून येथे जास्त गर्दी नसते.
बामणोली (Bamnoli Waterfall)
लोकप्रिय वासोटा किल्ल्यापासून जवळ असलेल्या बामणोलीला पावसाळ्यात भेट देणे म्हणजे काही वेगळाच अनुभव असतो. कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात मुसळधार पावसात गरमागरम भाजी खाण्यात एक वेगळीच मजा आहे.
सज्जनगड (Sajjangad)
अतिशय सुंदर विव्हसाठी सज्जनगड ओळखला जातो. पावसाळ्याच्या दिवसांत सज्जनगडावरून दिसणारी हिरवळ तुम्हला निशब्द केल्याशिवाय राहणार नाही.
कास पठार (kas Pathar)
सुंदर फुलांसाठी जगभर आपली ओळख बनवलेले कास पठार पावसाळ्यात फुलले पाहणे म्हणजे स्वर्गाचाच अनुभव घेण्यासारखं आहे. पावसाळ्यात कासेवर येणारी फुले पाहण्यासाठी दुरदुरून पर्यटक येत असतात.
Kelavali Waterfall
हिडन जेम म्हणून ओळखला जाणारा केळवली धबधबा हौशी पर्यटकांसाठी आवडीचं ठिकाण आहे. सह्याद्रीत लपलेला हा धबधबा निसर्गाचा एक अद्भुत अविष्कार म्हणावा लागेल.
चाळकेवाडी धबधबा (Chalkewadi Waterfall)
आकाराने लहान पण सौंदर्याने पर्यटकांना वेडे करणारा धबधबा म्हणजे चाळकेवाडी धबधबा. चाळकेवाडीचा समुपर्ण परिसरच अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. या भागात अनेक उत्तम रिसॉर्ट बनलेले असून फॅमिली टूरसाठी हे ठिकाण अतिशय बेस्ट आहे.