Satara News : नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक यात्रा उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
डोक्यावर पेटते भद्रकलश आणि श्री नवलाई देवीच्या नावाने चांगभलंचा जयघोष करत साताऱ्यातील ल्हासुर्णे येथील नवलाई देवीची भद्रकलश मिरवणूक यात्रा उत्साहात पार पडली. त्यामवेळी हजारो भाविक व ग्रामस्थ सहभागी झालेले होते.

यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. यात्रेनिमित्त पहाटे भाविक, ग्रामस्थांनी वसना नदीपासून मंदिरापर्यंत दंडवत घातले. मसाई मंदिराच्या पाठीमागे भाविक, भक्त गळ्यात फुलांचा हार घालून भद्रकलश घेऊन येतात. त्यात चंदनाच्या लाकडाचे छोटे- छोटे तुकडे टाकून त्यावर हळद कुंकू वाहिले जाते. त्यानंतर श्री नवलाईची पालखी गुलालाची उधळण करत वाद्य वाजवत श्री मसाई मंदिराजवळ आल्यानंतर हे सर्व भद्रकलश पेटवले जातात. यानंतर ‘श्री नवलाई देवीच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषात मिरवणुकीत सुरुवात होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नवलाई देवीच्या यात्रेस भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.