हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. तर चरणसिंह सपरा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली.
Congress appoints Ashok Arjunrao Jagthap as president and Charan Singh Sapra as working president of Mumbai Regional Congress Committee.
— ANI (@ANI) December 19, 2020
भाई जगताप यांच्या रुपाने काँग्रेसला मराठी चेहरा मिळाला आहे. तसंच पक्ष संघटनेत प्रदीर्घ अनुभव असणे ही भाई जगताप यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते. भाई जगताप यांच्यासाठी मिलिंद देवरा, अशोक चव्हाण हे आग्रही होते. त्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे
कोण आहेत भाई जगताप?
●अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख
●भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार.
●जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म
●भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’