खिल्ली उडवणाऱ्या भाजप नेत्यांना भाई जगताप यांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंधन दरवाढीवरून काँग्रेस कडून मोदी सरकार विरोधात काल राज्यभर बैलगाडी आंदोलन सुरू होते. दरम्यान, मुंबई येथील आंदोलना दरम्यान वापरण्यात आलेली बैलगाडी नेत्यांच्या वजनामुळे तुटली आणि याचवरून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत खिल्ली देखील उडवली होती. आता भाई जगताप यांनी यावर पलटवार करत भाजपला सुनावलं आहे.

भाई जगताप यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, माझ्या पडण्याच्या व्हिडिओसाठी उत्सुक असलेले भाजपाचे सर्व नेते जर देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्यसेवा यासाठी तितकेच उत्सुक असते, तर आज देशाची अशी स्थिती झाली नसती, असा टोला भाई जगताप यांनी लगावला आहे.

राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं- फडणवीस

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवली होती.  काँग्रेसचे नेते देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो, अशा घोषणा देत असताना कदाचित राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं, त्यामुळे ती बैलगाडी मोडली, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी त्या व्हिडिओवरून काँग्रेसला लगावला होता.

Leave a Comment