प्रेमप्रकरण मुलीच्या आईला कळालं..त्यानंतर तरुणाने केलं असं काही कि..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या शेतात दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यातील सोमलवाडा या ठिकाणी हि घटना घडली आहे. क्रिष्णा शालिक अतकरी असे आत्महत्या केलेल्या मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
मृत क्रिष्णा याचे त्याच्याच गावातील अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध जुळले होते. यादरम्यान अचानक या प्रेमसंबंधांची माहिती संबंधित मुलीच्या आईला मिळाली. तेव्हा मुलीच्या आईने मृत क्रिष्णा याच्यासोबत भांडण केले. यामुळे आता संपूर्ण गावात आपली बदनामी होणार या भीतीमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

या आधी सुद्धा क्रिष्णाने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काल भांडण झाल्यानंतर क्रिष्णा रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु केली. मात्र क्रिष्णा कुठेच आढळून आला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील एका व्यक्तीला क्रिष्णाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आणि पुढील तपासाला सुरुवात केली.

Leave a Comment