भारत बंदचा देवस्थानांवरही परिणाम; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गर्दी रोडावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी |
आज देशभर भारत बंदची हाक वेगवेगळ्या कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी दिली होती. शेतकरी, कामगारांसोबत शासकीय कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. या संपाचा बाजारपेठेवर आणि देवस्थानांवरही परिणाम झाल्याचं पहायला मिळालं. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आज शुकशुकाट पहायला मिळाला.

भारत बंदचा भाविकांवर परिणाम झाला आहे. भाविकांच्या संख्येत घट झाली असून नेहमी गजबजलेला विठ्ठल मंदिर परिसरात शांतता जाणवत आहे. बुधवार असूनही भाविकांची तुरळक गर्दी यावेळी दिसून आली. बुधवारी विठ्ठल दर्शन घेण्याची परंपरा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक बुधवारी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात, मात्र भारत बंदची हाक दिल्याने आज बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.

Leave a Comment