भारत भालकेंनी सुधाकर परिचारकांना दिला धोबीपछाड!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमदार भारत भालके यांनी सलग तिसऱ्यांदा विधानसभा जिंकली आहे. आधी अपक्ष, मग काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून भालके यांनी आपला गड राखला आहे.

शरद पवारांचा पठ्ठ्या निवडून आलाय असं म्हणत शिवसेनेचे अपक्ष बंडखोर उमेदवार समाधान अवताडे यांची निवडून येण्यास मदत झाली अशी मिश्किल प्रतिक्रिया भारत भालकेंनी दिली.

Leave a Comment