Bharat Ratna Award To Lal Krishna Advani : भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी याना सरकार कडून देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या हा नेहमीच माझ्यासाठी बहुमान असेल असेही मोदींनी यावेळी म्हंटल.
पंतप्रधान मोदींचे ट्विट काय?? Bharat Ratna Award To Lal Krishna Advani
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटल, मला हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे कि, श्री लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत मी त्यांच्याशी बोललो असून त्यांचे अभिनंदन सुद्धा केलं आहे. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असलेल्या अडवाणी यांचे भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशसेवा करण्यापर्यंतचे त्यांचे जीवन आहे. त्यांचे संसदीय हस्तक्षेप नेहमीच अनुकरणीय, समृद्ध अंतर्दृष्टीने भरलेले आहेत.
I am very happy to share that Shri LK Advani Ji will be conferred the Bharat Ratna. I also spoke to him and congratulated him on being conferred this honour. One of the most respected statesmen of our times, his contribution to the development of India is monumental. His is a… pic.twitter.com/Ya78qjJbPK
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024
मोदी पुढे म्हणाले, अडवाणी जी यांची सार्वजनिक जीवनातील अनेक दशके चाललेली सेवा पारदर्शकता आणि सचोटीच्या अटल वचनबद्धतेने चिन्हांकित केली गेली आहे. त्यांनी राजकीय नैतिकतेमध्ये एक अनुकरणीय मानक स्थापित केले आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अतुलनीय प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांना भारतरत्न प्रदान करणे (Bharat Ratna Award To Lal Krishna Advani) हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मला मिळाल्या हा मी नेहमीच माझा बहुमान मानेन असं म्हणत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लालकृष्ण अडवाणी यांचा थोडक्यात परिचय –
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची येथे झाला. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत त्यांनी अतिशय प्रतिकूल काळात भाजपचा संपूर्ण देशात प्रचार प्रसार केला. देशात इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसचं वार असताना त्यांनी तळागाळातुन पक्षाची बांधणी केली आणि संपूर्ण देश पिंजून काढला होता. राम मंदिरासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेचे नेतृत्व सुद्धा अडवाणींनी केलं होते. लालकृष्ण अडवाणी 5 वेळा लोकसभेतून आणि 4 वेळा राज्यसभेतून खासदार राहिले आहेत. 3 वेळा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही राहिले आहेत. 2002 ते 2004 दरम्यान ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील 7 वे उपपंतप्रधान होते. यापूर्वी 2015 मध्ये, लालकृष्ण अडवाणी याना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. आता त्यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.