आता Bharat Series मध्ये करता येणार वाहनांचे रजिस्ट्रेशन, तुम्ही दुसऱ्या राज्यात गेल्यास कोणतीही अडचण येणार नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सीरीज (Bharat series) बाबत अधिसूचना जारी केली आहे. या नियमानुसार नवीन वाहनांना BH सीरीजमध्ये रजिस्टर्ड करावे लागेल. या सीरीजचा जास्तीत जास्त फायदा त्या वाहन मालकांना होईल, जे नोकरीच्या संदर्भात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात. भारत सीरीज अंतर्गत रजिस्ट्रेशन नंबर घेऊन, त्या वाहन मालकांना नवीन राज्यात जाण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन नंबर घेण्याची गरज भासणार नाही आणि जर नवीन सिस्टीम अंतर्गत वाहन मालक दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाला, तर तो सहजपणे आपले वाहन घेऊ शकतो. जुन्या रजिस्ट्रेशन नंबरद्वारेच गाडी चालवता येईल. चला तर मग या Bharat series चे फायदे जाणून घेऊयात.

या लोकांना BH Vehicle Series चा फायदा होईल
BH Vehicle Series मुळे केंद्र सरकारचे कर्मचारी, आर्मी आणि त्या इतर लोकांना फायदा होईल जे नोकरी आणि कामाच्या संदर्भात अनेकदा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहतात. BH Vehicle Series लागू झाल्यानंतर या लोकांना त्यांच्या वाहनासाठी पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर घ्यावा लागणार नाही. ही सर्व लोकं नवीन राज्यात फक्त जुन्या रजिस्ट्रेशन नंबरसह आपली वाहने चालवू शकतील.

Bharat series

BH रजिस्ट्रेशन अशा प्रकारे दिसेल
BH रजिस्ट्रेशनचा फॉर्मेट YY BH 5529 XX YY असा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पहिल्या रजिस्ट्रेशनचे वर्ष BH – भारत सीरीज कोड 4 – 0000 ते 9999 XX अल्फाबेट्स (AA ते ZZ).

MORTH ने अधिसूचनेत असे म्हटले आहे
BH सीरीज अंतर्गत मोटर वाहन टॅक्स दोन वर्षांसाठी किंवा 4, 6, 8 वर्षांसाठी आकारला जाईल…. ही योजना खाजगी वाहनांना नवीन राज्यात स्थलांतरित केल्यावर मोफत फिरण्याची सोय उपलब्ध करेल. चौदाव्या वर्षानंतर मोटार वाहन टॅक्स दरवर्षी आकारला जाईल जो त्या वाहनासाठी पूर्वी गोळा केलेल्या रकमेच्या निम्मा असेल