पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्येही आता कोरोनावर उपचार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरोधात सुरु असलेल्या लढ्यात सिम्बॉयोसिस पाठोपाठ आता भारती हॉस्पिटलही सहभागी झाले आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्येही आता कोरोनावर उपचार केला जाणार आहे. कोरोनावरील उपचारांसाठी भारती हॉस्पिटलमध्ये १३५ विलगीकरण व १५ अतिदक्षता बेड्स उपलब्ध झाले आहेत अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

भारती हॉस्पिटलला PPE किट आणि N95 मास्क महापालिका पुरवणार असून कोरोना संशयित रुग्ण, बाधित रुग्ण व्यवस्थापन, उपचार आणि मनुष्यबळ सेवा सुविधा दिली जाणार आहे. रुग्णावरील खर्च हा मनपाचे वतीने शासनाच्या CGHS नुसार भारती विद्यापीठास देण्यात येणार आहे असेही मोहोळ यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनावरील उपचारांसाठी हॉस्पिटल उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, व्यवस्थापकिय संचालक डॉ. अस्मिता जगताप आणि टीमचे कौतुक होत आहे. पुणे मनपा क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या अाता २५३ वर पोहोचली अाहे. आगामी काळात हा आकडा वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सदर निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

tdh

Leave a Comment