प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना भारतरत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था |

भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारताचा सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार भारतरत्न पुरस्काराची घोषणा केली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख, आणि भुपेन हजारिका यांना भारतरत्न देण्याची घोषणा झाली.
भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना मरणोत्तर तर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिला जाणार आहे.

नानाजी देशमुख हे ग्रामीण भागात योगदान देणारे, भारताचे पारंपरिक संगीत जगभर पोहचवणारे आणि संगीताला लोकप्रिय बनवणारे भुपेन हजारिका तसेच आजच्या काळातील मातब्बर राजनेता म्हणून ओळखले जाणारे प्रणव मुखर्जी अशाप्रकारे तीन वेगवेगळे ट्विट करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिन्ही पुरस्कारार्थीचे महत्त्व स्पष्ट केले.

नानाजी देशमुख यांचा प्रवास

●११ ऑक्टोबर १९१६ हिंगोली येथे जन्म झाला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या माध्यमातून त्यांनी विविध समाजकार्य केले.
१९७७ मध्ये जनता पार्टीकडून बलरामपूर लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले.

● १९८० साली त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला.
आणि दीनदयाळ शोध संस्था स्थापन केली,आणि त्याद्वारे त्यानी समाजकार्य केले.

● १९९९ साली अटलबिहारी यांच्या काळात राज्यसभा सदस्य आणि त्याच साली पदमविभूषण ने सन्मानीत करण्यात आले.
● ९५ वर्षाचे असताना, त्यांचा मृत्यू २७ फेब्रुवारी २०१० ला चित्रकूट येथे झाला.

भुपेन हजारीका यांचे योगदान

●एक संगीतकार, गायक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि आसामच्या संस्कृतीचे जाणकार होते.
मूळ भाषा आसाम तसेच हिंदी,बंगाली आणि इतरही भाषेत त्यांनी गाणे गायली. पारंपरिक असामी संगीताला जगभर लोकप्रिय बनवण्याचे श्रेय त्यांनाच जाते.

● ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटात महात्मा गांधी यांचे आवडते ‘वैष्णव जण…’ हे भजनही गायले.
● पदमविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.
अटलबिहारिंच्या काळात ते भाजपामध्ये सामील झाले.
● त्यांचा मृत्यू ५ नोव्हेंबर २०१० रोजी झाला.

पाच दशके अनुभवलेले राजकीय नेते प्रणव मुखर्जी

● देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
जुलै १९६९ साली पाहिल्यांदा राज्यसभा सदस्य झाले. त्यानंतर १९७५, १९८१, १९९३,१९९९ राज्यसभेसाठी निवडून आले. २००४ साली लोकसभा सदस्य झाले.

● २००४ ते २०१४ पर्यंत देशाचे केंद्रीयमंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांना त्याकाळी काँग्रेसचे ‘संकटमोचन’ म्हणून ओळखले जाई. त्यानंतर ते ५ वर्षे राष्ट्पती होते.

Leave a Comment