टीम, HELLO महाराष्ट्र । स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि आदिवासी नेता बिरसा मुंडा यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करावे, अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी गुरुवारी लोकसभेत केली.शून्य प्रहरात गावितांनी आदिवासी नेता बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करणारे छोटेखानी भाषण दिले. त्यामध्ये मुंडा यांना भारतरत्न देण्याची मागणी करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे, असे ते म्हणाले.
सावरकरांना भारतरत्न द्यावे अशी आग्रही मागणी शिवसेना गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहे. लोकसभेमध्ये दिवसभरात खासदारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी देशाच्या खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करत धार्मिक मुद्द्यांवरच अदिक लक्ष केंद्रित करत आहेत, असा आरोपही रॉय यांनी केला.