मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भास्कर जाधवांनी मागितली माफी; फडणवीसांचे ‘हे’ चॅलेंजही स्वीकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा हिवाळी अधिवेशनात आज शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी फडणवीस यांनी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाल्यानंतर अखेर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागत वादावर पडदा टाकला.

भास्कर जाधव म्हणाले, माझ्या बोलण्याच्या वेळी नकळत हातवारे होतात. मी नक्कल केली. मात्र, मी असंसदीय शब्द उच्चारलेले नाहीत. अध्यक्ष महोदय तुमच्या सूचनेनुसार मी बिनशर्त माफी मागत आहे, यानंतरही देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात हक्कभंग आणणार असतील तर मी त्यासाठी तयार असल्याचेही भास्कर जाधव यांनी म्हटले.

विधानसभेत पंतप्रधान मोदींवर ऊर्जामंत्र्यांनी केला हा गंभीर आरोप..फडणवीसांची तळपायाची आग केली मस्तकात

सभागृहात नेमकं काय घडलं-

विजबिलाच्या मुद्द्यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोदींच्या 15 लाख रुपये देण्याचा दाखला दिल्यानंतर फडणवीस आक्रमक झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं आश्वासन कधीही दिलच नव्हतं, त्यामुळे नितीन राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी फडणवीसानी केली. त्यानंतर भास्कर जाधव उठून उभा राहीले आणि त्यांनी मोदींची नक्कल केली. 2014 साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणले, ‘काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का.. ‘. अशा प्रकारे नक्कल करताना त्यांनी अंगविक्षेपही केला.

Leave a Comment