विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली, राज्याच्या इतिहासात असं कधी झालं नाही; भास्कर जाधवांनी विरोधकांना सुनावलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. त्यावेळी त्यांनी मला आई बहिणीवरून शिवीगाळ केली असा गंभीर आरोप करत संभागृहातील हे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारी आहे आहे असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हंटल.

भास्कर जाधव म्हणाले, विरोधी आमदारांनी मला शिवीगाळ केली ठराव मांडण्याआधीच विरोधकांनी गदारोळ केला काही विरोधी आमदार माझ्या वर तुटून पडले राज्याच्या इतिहासात असं कधी झालं नाही संभागृहातील हे वर्तन लांछनास्पद असून काळिमा फासणारी आहे आहे.

आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो पण हे सदस्यगावगुंडाप्रमाणे वागत होते, असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. असे भास्कर जाधव यांनी म्हंटल. मी जर एकही असंसदीय शब्द बोललो असेल किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं

Leave a Comment