हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhasma Holi) जगभरातील तमाम लोकांचा आवडता सण म्हणजे ‘होळी’. भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. ठिकठिकाणी गुलाल, फुले, पाणी आणि रंगाने होळी खेळली जाते. अनेक भागांतील होळी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे.
जसं की, यूपीच्या बरसाणा येथील लठमार होळी के तो क्या केहने. तसेच मथुरेचा होळी सण ज्याला ‘ब्रज होळी’ म्हणून जगभरात ओळखले जाते. राधाराणीच्या मंदिरात ‘लाडू होळी’ साजरी केली जाते. तर वृंदावनात फुलांनी होळी साजरी केली जाते. मात्र, या रंगबेरंगी माहोलमध्ये एका ठिकाणी चितेच्या राखेने होळी खेळली जाते. होय. तुम्ही बरोबर वाचताय. या अनोख्या होळीविषयी आपण आज माहिती घेऊया.
चितेच्या राखेने कुठे खेळली जाते होळी?
उत्तराखंडमधील ‘काशी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उत्तरकाशीच्या काशी विश्वनाथ मंदिरात ही ‘भस्म होळी’ (Bhasma Holi) खेळली जाते. येथील स्थायिक सांगतात की, गेल्या १० वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. स्थानिक रहिवासी या मंदिरात वर्षभर होणाऱ्या यज्ञाची अस्थी एकमेकांना लावतात. विशेष सांगायचे म्हणजे, ही अस्थी भाविक मोठ्या श्रद्धेने प्रसाद म्हणून घरीसुद्धा नेतात. या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या संख्येने महादेवाचे भक्त जमा होतात आणि स्मशानभूमीत मृतदेहांच्या राखेने होळी खेळतात.
मृतदेहांच्या राखेने खेळतात होळी
एका वृत्तानुसार, काशी विश्वनाथ मंदिराचे महंत अजय पुरी यांनी (Bhasma Holi) ‘भस्म होळी’बाबत काही महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भस्माची होळी ही नैसर्गिक होळीला प्रोत्साहन देते. कारण सध्या होळीच्या रंगांसाठी केमिकल्सचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. मात्र यज्ञातील भस्म हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. येथे स्थानिक लोकांमध्ये भस्म होळीची विशेष उत्सुकता बघायला मिळते. जेव्हा बाबा विश्वनाथांची पालखी निघते तेव्हा लोक या सोहळ्यात रंग खेळतात.
भाविकांसोबत महादेव खेळतात ‘भस्म होळी’ (Bhasma Holi)
या परंपरेविषयी बोलताना अनेक लोक सांगतात की, भगवान शिव हे माता पार्वतीची गौना पुजा करुन दरबारात परततात. दुसऱ्या दिवशी महादेव आपल्या स्वरुपात स्मानभूमीत येतात आणि घाटावरील जळत्या चितेच्या राखेने होळी खेळतात. या परंपरेतून हा उत्सव साजरा केला जातो. (Bhasma Holi) यावेळी भाविक ढोल- ताशांच्या गजरात, हर हर महादेवाच्या रंगात रंगून भांग आणि थंडाईचा आस्वाद घेतात. तसेच याठिकाणी लोक एकमेकांना भस्म लावतानाचे एक अनोखे आणि अद्भुत दृश्य इथे पहायला मिळते. लोकांची आस्था आहे की, स्वतः महादेव भक्तांसोबत भस्म होळी खेळतात.
मोक्ष नगरी
काशी नगरी आणि भगवान शिवाचं वेगळंच नातं आहे. काशीला ‘मोक्ष नगरी’ म्हटले जाते. कारण, इथे मृत्यूला विटाळ नव्हे तर पवित्र समजले जाते. (Bhasma Holi) काशीतील मणिकर्णिका घाटावर भगवान शिवाने मोक्ष प्रदान करण्याची शपथ घेतली होती, असं अनेक पुराण कथांमध्ये म्हटले आहे. इथे महादेव स्वतः वास करतात आणि इथल्या प्रत्येक माणसाचे ते सोबती आहेत. महादेव प्रत्येक सणात सहभागी होतात त्यामुळे भक्तांनी भस्म होळी ही परंपरा जतन केली आहे.
परंपरेचा अर्थ
काशीत ‘भस्म होळी’ साजरी करण्याच्या परंपरेचा अर्थ असे सूचित करतो की, भगवान शिव आणि देवी पार्वती यांनी रंगभरी एकादशीला त्यांच्या लग्नानंतर इतर देवी- देवतांसह होळी खेळली होती. मात्र, या उत्सवात भूत- प्रेत, पिशाच्च, गण, जीव जंतू तसेच प्राणी सामील झाले नव्हते. त्यामुळे भोलेनाथ शंभू महादेव त्यांच्यासोबत होळी खेळण्यासाठी दुसऱ्या दिवशी परत मणिकर्णिका तीर्थावर येतात आणि आपल्या गणांसोबत चितेच्या राखेने होळी खेळतात. आजही ही परंपरा कायम आहे आणि हि परंपरा महादेवाचे सर्व प्राण्यांसाठी असलेले समान प्रेम, माया आणि आपलेपणा दर्शवते. (Bhasma Holi)