Voter Awareness: मतदान ओळखपत्र नसतानाही मतदान येत का करता?? वाचा काय सांगतो कायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदा अनेक तरुण मुलं-मुली लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. हे मतदान करत असताना त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्यक असेल. परंतु एखाद्या व्यक्तीकडे चुकून हे ओळखपत्र (Voting card) नसेल तर त्याला देखील मतदान करता येईल. परंतु हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही संपूर्ण बातमी वाचा.

ऑनलाइन मतदान यादीत नाव नोंदवा (Voter Awareness)

तुम्हाला जर काही तांत्रिक कारणांमुळे मतदान ओळखपत्र मिळाले नसेल तर तरी देखील तुम्ही देखील बूथवर जाऊन मतदान करू शकतो. परंतु त्यासाठी तुमचे मतदान यादीत नाव असणे गरजेचे आहे. तुम्हाला जर तुमचे नाव मतदान यादीत द्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन 6 नंबरचा फॉर्म भरावा लागेल. संपूर्ण नाव जन्मतारीख आणि पत्ता अशी वैयक्तिक माहिती या फॉर्ममध्ये भरावी लागेल. यानंतर पूर्ण प्रक्रिया करून कागदपत्रे जोडून हा फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागेल.(Voter Awareness)

तसेच तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने मतदान यादीमध्ये नाव नोंदवायचे असेल तर यासाठी वेगळी प्रोसेस पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला फॉर्म 6 हा निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी यांच्याकडून घ्यावा लागेल. तसेच या फॉर्मला सर्व कागदपत्रे जोडून तो संबंधित अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करावा लागेल. लक्षात ठेवा की, एखाद्या व्यक्तीला मतदान ओळखपत्र (Voter Awareness) नसतानाही मतदान करता येऊ शकते. परंतु त्यासाठी त्या व्यक्तीचे नाव मतदान यादी देणे गरजेचे आहे.