हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा विदर्भातला हक्काचा आणि भरभरून प्रेम देणारा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ वाशिम…(Yavatmal Washim Lok Sabha 2024) अनेक जातीपातींच्या संमिश्र पॅटर्नने तयार झालेल्या या मतदारसंघात सलग पाच टर्म निवडून येण्याचा विक्रम शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केलाय…काँग्रेसने अनेक मातब्बरांच्या साथीनं गवळी यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला…पण भावना गवळी (Bhavana Gawali)_यवतमाळ वाशिमच्या राजकारणात नेहमीच वरचढ राहिल्या…मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आलं आणि यवतमाळच्या राजकारणालाच मोठा धक्का बसला. शिंदे गटाकडून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील याना यवतमाळ वाशीम लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संजय देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
तस पाहिले तर बंजारा, कुणबी मराठा, दलित आणि मुस्लिम समाजाच्या घुसळणीतून तयार झालेला हा महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मतदारसंघ.. वाशिम मधील दोन तर बुलढाण्याच्या चार विधानसभांनी मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय…मतदारसंघातून 1999 पासून सतत पाच वेळा सेनेच्या भावना गवळी यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. स्वतंत्र वाशिम मतदार संघात दोन वेळा आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात तीन वेळा त्यांनी आपल्या विजयाचा मनसुबा फसू दिला नाही…मात्र शिंदे गटाने हिंगोली मधून हेमंत पाटील यांचे तिकीट कापलं आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील याना यवतमाळ वाशीम लोकसभेची उमेदवारी दिली. राजश्री पाटील (Rajashri Patil) यांच्या उमेदवारीवर भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोललं जात आहे. हि नाराजी मतदानाच्या दिवशी उफाळून आली तर याठिकाणी ठाकरेंच्या संजय देशमुख याना फायदा होऊ शकतो.
राजश्री पाटील यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. तसंच त्यांची वक्तृत्व शैलीही चांगली असल्यामुळं त्याचा फायदा होऊ शकतो.राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजातील आहेत. यवतमाळ – वाशिम मतदारसंघात तिरळे कुणबी समाजाची तब्बल दीड लाख मते आहेत, हि मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी राजश्री पाटील यांच्या उमेदवारीचा फायदा भाजपला होऊ शकतो.
दुसरीकडे, काही झालं तरी महायुतीच्या उमेदवाराला पाडायचंच यासाठी ठाकरेंनी घोडे मैदान सज्ज ठेवलय… माजी मंत्री संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांना निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश ‘मातोश्री’वरून मिळाल्याने येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेना वर्सेस शिवसेना असे चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे…यवतमाळ वाशिमच्या निमित्ताने शिवसेना कुणाची? हा जनतेचा कौल ही निकालानंतर स्पष्ट होईल…ठाकरे गटाने मतदार संघातून महाप्रबोधन यात्रा, स्वतः उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीला दिलेली भेट यावरून तरी ठाकरेंनी या मतदार संघावर जास्त फोकस ठेवल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संजय देशमुख आता राजश्री पाटील याना भारी पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. मात्र यापेक्षा जास्त लक्ष्य यावर आहे कि आता भावना गवळी यांच्या राजकीय कारकिर्दीचे काय होणार? उमेदवारीचा गेल्यामुळे भावना गवळी यांच्यासमोरचे पर्याय काय आहेत .. तुम्हाला काय वाटत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.