Thursday, February 2, 2023

प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला 361 वर्षे पूर्ण; 361 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला गड

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारा प्रतापगड किल्ला आज 361 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला.या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 361 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव साजरा करण्यात आला. सध्या कोरोनाचे संकट असल्याने अत्यंत साधेपणाने आणि सोशल डिस्टन्स पाळून हा सोहळा साजरा करण्यात आला.

- Advertisement -

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदी मध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना 1661 मध्ये केली. या घटनेला आज 361 वर्षे पूर्ण झाले असुन प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये 1 मशालीची वाढ होते आहे.या वर्षी 361 मशालिनी किल्ला तेजोमय झाला .

यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. या वर्षी मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन या ठिकाणचे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्यात आले.सोशल डिस्टन्सचा नियमाचे पालन करुन यावर्षी महिला आणि तरुणींच्या हस्ते गडाच्या पूर्ण तटाच्या बाजूला मशाली पेटवण्यात आल्या हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता

नवरात्रातील चतुर्थीला मशाली पेटविण्याची हि परंपरा 2010 पासून स्थानिक लोकांनी सुरु केली.तब्बल 11 वर्ष यात खंड पडू दिला गेला नाही.मात्र कोरोना मुळे गेल्या दोन वर्षात साधे पणाने का होईना मशाल महोत्सव साजरा केला जातो आहे.