Bhendwal Ghatmandni | भेंडवळच्या भविष्यवाणीत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पावसाने होणार पिकांची भरभराट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhendwal Ghatmandni | आपण वातावरणाबाबत हवामान विभागाने दिलेले अंदाज नेहमीच पाहत असतो. परंतु अनेकवेळा हवामान विभागाचे अंदाज खोटे ठरतात. परंतु वऱ्हाडातील सुमारे दीडशे वर्षांपासून एक परंपरा आहे. ती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असते. यासाठी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान, पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवतात. त्यामुळे शेतकरी बी- बियाणे कंपनी देखील येथे गर्दी करत असतात .

यावर्षी वाघ कुळातील चंद्रभान महाराज यांनी या घटमांडणीची आणि भविष्यवाणीची सुरुवात केली. यामध्ये प्रामुख्याने कृषीविषयक पिके, पाऊस, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्य तसेच राजकारण या सगळ्या गोष्टीबाबत वर्षभराचे भाकीत करण्यात आलेले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गावाजवळच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात या गटाचे मांडणी केली. आणि दुसऱ्या दिवशी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून करण्यात आलेले आहे. पाण्याचे नियोजन करतात. परंतु यावर्षी त्यांनी राजकीय भाकीत वर्तवले नाही.

यावर्षी पाऊस कसा असेल? | Bhendwal Ghatmandni

या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत आहे. आणि यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितलेला आहे. पहिला महिना कमी पाऊस असणार आहे, तर दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण माणूस असणार आहे. दुसऱ्या महिन्यात जास्त आणि भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर चौथ्या महिन्यात अवकाळी पाऊस वर्तवलेला आहे.

पीक पाण्याचे नियोजन आणि भाकीत | Bhendwal Ghatmandni

यावर्षी ज्वारी पिकाचे सर्वसाधारण उत्पन्न असल्याचे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण उत्पन्न असल्याचे देखील सांगण्यात आलेले आहे. मूग आणि उडदाचे उत्पन्न देखील चांगले असणार आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी तिळाचे उत्पन्न चांगले असणार आहेत. त्याचप्रमाणे पिकांवर रोगराई पडेल. आणि बाजरीचे पीक सर्वसाधारण असणार आहे. हरभरा पिकाचे पीक भाव मात्र निश्चित केलेला नाही.