Vande Bhart Express : राज्यातल्या आणखी एका शहराला मिळणार ‘वंदे भारत’ ; PM मोदींनी दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Vande Bhart Express : संपूर्ण देशामध्ये नावाजली गेलेली वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) महाराष्ट्रातही मोठ्या पसंतीस उतरत आहे. सध्याचा विचार करता सध्या महाराष्ट्रात एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र आणखी एका शहराला वंदे भारत एक्सप्रेस जोडली जाणार आहे. होय, आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत ते शहर म्हणजे ‘कोल्हापूर’. राज्यातल्या इतर शहराला जोडल्यानंतर कोल्हापूरातूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) सुरू होणार असा दावा केला होता. दानवे यांनी त्यावेळी येत्या दोन महिन्यात कोल्हापूरला वंदे भारत ट्रेन मिळणार असे म्हटले होते. मात्र, आता मे महिना उलटत चालला आहे तरीही कोल्हापूरला वंदे भारत ट्रेनची भेट मिळालेली नाही. त्यामुळे शहरात वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरु होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

पंतप्रधान मोदींनी दिले संकेत (Vande Bhart Express)

मात्र नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोल्हापुरात झालेल्या प्रचारसमभाध्ये वंदे भारत एक्सप्रेस बाबत अपडेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असे म्हटले आहे.यामुळे पुन्हा एकदा या वंदे भारत एक्सप्रेसच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार, लोकसभा निवडणुका संपल्यानंतर जे नवीन सरकार केंद्रात सत्ता स्थापित करेल ते नवीन सरकार मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) सुरू करू शकते. असे झाल्यास मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई हा प्रवास निश्चितच मोठा गतिमान होणार आहे.

कोल्हापूर म्हणजे महालक्ष्मी आंबाबाईचे प्रसिद्ध स्थान असून संपूर्ण देशभरातून येथे भाविक येत असतात. त्यामुळे जर मुंबई -कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) सुरु झाली तर भाविकांची चांगली सोय होणार आहे.