Bhide Bridge Pune : पुण्यातील ‘हा’ महत्वाचा पूल दीड महिने बंदच राहणार

Bhide Bridge Pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bhide Bridge Pune । पुण्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. मागील जवळपास ३ महिन्यांपासून बंद असलेला भिडे पूल आणखी दीड महिना बंदच राहणार आहे. खरं तर सदाशिव पेठेतून डेक्कन मेट्रो स्टेशनकडे जाण्यासाठी भिडे पुलावर लोखंडी पादचारी पूल उभारण्याचे काम सुरु आहे. यासाठी महामेट्रोने मागील ३ महिन्यापासून भिडे पूल बंद ठेवला आहे. मात्र इतके दिवस होऊनही पादचारी पुलाचे काम अवघे २० टक्केच झालं आहे. त्यामुळे उर्वरित कामासाठी भिडे पूल आणखी दीड महिने बंद ठेवावा लागणार आहे.

महामेट्रोने जून महिन्यात भिडे पुलाच्या (Bhide Bridge Pune) कामाला सुरुवात केली होती. या पादचारी पुलाचं काम जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल आणि ६ जून पासून हा पूल प्रवाशांसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र हे काम म्हणावं त्या वेगाने झालं नाही. इतका काळ जाऊनही या पुलाचे काम अजून २० टक्केही पूर्ण झालं नाहीय. त्यामुळे महामेट्रोकडून हा पूल १५ ऑगस्टपर्यंत बंद ठेवावा अशी मागणी वाहतूक पोलीस आणि महापालिकेकडे करण्यात आली आहे. महामेट्रोकडून उभारण्यात येणारा हा पूल लोखंडी असल्याने त्याचे खांब आधीच उभारण्यात आले आहेत. आता त्यावर केवळ स्ट्रक्चर जोडण्याचे काम सुरू आहे. तयामुळे पावसाळ्यातही पुलाचे काम सुरूच राहणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे. मात्र पाणी सोडण्याच्या वेळी काम बंद ठेवले जाईल असेही महामेट्रोकडून सांगण्यात आले.

पुण्यासाठी महत्वाचा आहे भिडे पूल – Bhide Bridge Pune

दरम्यान, भिडे पूल हा पुणे शहराच्या वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा असा पूल आहे. शहराच्या पश्चिम उपनगरातील बहुतांश दुचाकी वाहतूक ही या नदीपात्रातील भिडे पुलावरून होते. शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येण्यासाठी दुचाकीस्वारांना हा अतिशय सोप्पा मार्ग आहे. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख मोटारसायकली या रस्त्यावर पाहायला मिळतात. पावसाळ्यात फक्त मुठा नदीला पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. परंतु,आता मेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडे पूल बंद (Bhide Bridge Pune) करण्यात आला आहे. या रस्त्यावरून येणारी दुचाकी वाहनांची वाहतूक डेक्कनवरून लकडी पुलामार्गे शहरात वळवण्यात आली आहे.