दिल्ली निवडणुकीत भीम आर्मीच्या चंद्रशेखरची दमदार एन्ट्री, काही अटी घालून न्यायालयाने निर्बंध उठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देणाऱ्या भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर यांचा दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तीस हजारी कोर्टाने चंद्रशेखर यांच्यावरील निर्बंध उठवले असून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं हा भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा खुलासा न्यायालयाने दिला आहे.

२० डिसेंबर रोजी दिल्लीतील जामा मशीद येथे घेण्यात आलेल्या सभेत भावना भडकवणारं भाषण केल्याचा ठपका चंद्रशेखर यांच्यावर ठेवण्यात आला होता. हे आरोप दिल्ली पोलिसांना सिद्ध करता न आल्याने न्यायालयाने त्यांना फटकारलं होतं. १५ जानेवारीला यासंदर्भातील जामीन मिळूनसुद्धा चंद्रशेखर यांना ४ आठवड्यांसाठी दिल्ली बंदी करण्यात आली होती. हा कालावधी निवडणूक निकालापर्यंत जात असल्याने याविरोधात चंद्रशेखर यांनी कोर्टात पुन्हा दाद मागितली आणि कोर्टाने त्यांचं म्हणणं विचारात घेऊन त्यांच्या दिल्ली प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे.

ही परवानगी देताना न्यायालयाने त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनला हजर राहून तेथील डीवायएसपिंना आपल्या दैनंदिन प्रचार कार्यक्रमाची माहिती देण्याच्या सूचना चंद्रशेखर यांना केल्या आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि भाजपला कडाडून विरोध करणाऱ्या चंद्रशेखर यांच्या प्रचारातील सहभागाचा फायदा आम आदमी पक्षाला होणार का हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

दिल्ली विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ उमेदवारांची यादी जाहीर

“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

U-19 World Cup: अवघ्या २९ चेंडूत टीम इंडियाने मिळवला विजय

Leave a Comment