हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महत्वाची घटना मानल्या जाणाऱ्या भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचे २ ऑगस्टपासून कामकाज सुरु होणार आहे. या घटनेत साक्ष नोंदविण्यात येणार आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही आपली साक्ष नोंदविणार आहेत.
दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा या ठिकाणी हिंसाचार घडणारी घटना घडली. याला आता नवे वळण प्राप्त झाले असून या घटनेच्या चौकशीसाठी नवीन आयोगही नेमण्यात आलेला आहे. या आयोगाच्या नेमणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी भीमा कोरेगाव घटनेबाबत माहितीही दिली होती. पवार यांनी दिलेल्या माहितीनंतर त्यांची साक्ष नोंदविण्याची मागणी नेमण्यात आलेल्या आयोगाकडे करण्यात आली आहे.
त्यामुळे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भीमा कोरेगाव प्रकरण व एल्गार परिषद चौकशी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नेमकी काय साक्ष देणार हे? पुढे पहावे लागणार आहे. याबाबत अॅड. प्रदीप गावडे म्हणाले कि, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष घ्यावी, अशी मागणी आयोगाकडे अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार आयोगाकडून अध्यक्ष पवार यांची साक्ष घेतली जाणार आहे.