भिवंडीत आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून, आरोपी अजूनही मोकाट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे प्रतिनिधी। भिवंडीत एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र या महिलेचा बलात्कार करून आयुष्य संपवणारा नराधम मोकाटच फिरत. सदर बलात्कार आणि खून प्रकरणांत अजून आरोपीला अटक करण्यात आली नाही आहे. प्रीती भावर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सदर महिला कामावरून घरी जात असताना तिला एका अज्ञात नराधमाने पकडून तिच्यावर बलात्कार करून नंतर गळा दाबून खून केला. त्यानंतर आरोपीने घटना स्थळावरून पलायन केले . या घटनेबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र पोलीस तपासात या आरोपीचा अजूनही पत्ता लागलेला नाही आहे. त्यामुळे संबंधित आरोपीला तत्काळ ताब्यात घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी करत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गणेशपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले आहे.

Leave a Comment