कुंकवात गुंगीचे औषध टाकून भोंदूबाबाने सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या भामट्याने महिलेचे हिऱ्याच्या अंगठीसह ३२ हजाराचे सोन्याचे दागीने पळवून नेले. विशेष म्हणजे देवाच्या नावाखाली कुंकवासारख्या पदार्थाचा वास घेण्यास सांगीतल्यानंतर महिला बेशुद्ध झाल्यानंतर ही चोरी करण्यात आली आहे.  ही घटना शुक्रवारी ज्ञानेश्वरी कॉलनी येथे घडली.

सिडको एन-४ येथील रहिवासी फिर्यादी चेतना निखील भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी (ता. २३) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या आत्याच्या घरी जे सेक्टर ज्ञानेश्वरी काँलनी मुकुंदवाडी येथे एक उंचपुरा सावळ्या रंगाचा व्यक्ती आला. त्याच्या अंगावर  पांढऱ्या रंगाचे धोतर, भगव्या रंगाचा शर्ट व डोक्याला पिवळा पटका बांधलेला होता. त्याचे अंदाचे वय ४५ वर्ष आहे.

या व्यक्तीने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने कुंकासारखा काहीतरी पदार्थ टाकला व तुम्ही वास घेवून देवाचे दर्शन घ्या, असे सांगीतले. मात्र हा पदार्थाचा वास घेतल्यानंतर डोके सुन्न झाले, गुंगी आली. त्यानंतर मात्र त्या भामट्याने सहा हजाराची तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी, तब्बल २६ हजाराची हिराचा खडा असलेली साडेतीन ग्रँम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण ३२ हजाराचा ऐवज घेऊन पलायन केले. या प्रकरणी मुकूंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भामट्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केले आहेत.

Leave a Comment