Bhu Nakasha Maharashtra : केवळ 2 मिनिटं…! हातात येईल तुमच्या गावाचा गट नंबर सहित संपूर्ण नकाशा

bhu nakasha maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Bhu Nakasha Maharashtra : आपल्याला माहितीच असेल की, राज्याच्या सरकारी यंत्रणेत सुद्धा डिजिटलायझेशन झाले आहे. त्यामुळे एखादा सरकारी फॉर्म भरण्यासाठी किंवा सरकारी कागद मिळवण्यासाठी तासंतास रांगेत उभारण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या किंवा घरातील कॉम्पुटर च्या साहाय्याने सुद्धा घर बसल्या शेत किंवा जमिनीचा नकाशा पाहू शकता. आता त्यासाठी ही सर्व प्रक्रिया आपल्याला ऑनलाईन (Bhu Nakasha Maharashtra) पद्धतीने करावी लागेल. ही प्रक्रिया खूप सोपी आहे त्यामुळे अवघ्या २ मिनिटात तुम्ही चला तर मग जाणून घेऊया…

जमिनीचा नकाशा कशासाठी वापरू शकता ?

  • ऑनलाईन पद्धतीने काढलेल्या या जमिनीच्या नकाशाचा (Bhu Nakasha Maharashtra) वापर केवळ माहितीसाठी करू शकता.
  • ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड केलेल्या जमिनीच्या नकाशामध्ये जमिनीच्या मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ आणि दिशा निर्देशांची माहिती नमूद केलेली असते.
  • जमिनीची मालकी दाखवण्यासाठी आणि विशिष्ट कारणासाठी प्रमाणित नकाशा आवश्यक असेल.
  • हा नकाशा बँकेच्या उद्देशासाठी वैध धरला जात नाही.
  • जर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड किंवा इतर सरकारी योजनांमध्ये सामील होण्यासाठी तलाठी /लेखापाल यांनी प्रमाणित केलेला जमिनीचा नकाशा वैध मानला जातो.

जमिनीचा नकाशा कशाप्रकारे ऑनलाईन डाउनलोड कराल?

  • सर्वात आधी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यानंतर वरच्या बाजूला तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.
  • अधिकृत पोर्टलला भेट देताच कॅटेगरी, जिल्हा, तालुका, गावाचं नाव तुम्हाला अशी माहिती भरावी लागेल.
  • त्यानंतर यामध्ये प्लॉट नंबर किंवा सर्वे गट नंबर टाका.
  • त्यानंतर तुम्हाला पाहायचा असलेल्या प्लॉटफिल्ड चा नकाशा (Bhu Nakasha Maharashtra) दिसेल. त्या नकाशावर दिसणाऱ्या गट नंबर वर क्लिक करा त्यानंतर प्लॉट इन्फो वर क्लिक करा
  • प्लॉट इन्फॉवर क्लिक केल्यानंतर गट नंबरच्या आधारे तुम्हाला जमिनीच्या मालकीचे डिटेल्स दिसतील. त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा तुम्ही प्रविष्ट केलेल्या माहितीची संपूर्ण शुद्धता सुनिश्चित केल्यानंतर पुढील प्रक्रिया करा.
  • त्यानंतर मॅप रिपोर्ट वर क्लिक करा.
  • जमिनीच्या मालकीची संपूर्ण पडताळणी केल्यानंतर मॅप रिपोर्टवर क्लिक करा गट नंबरच्या आधारे नकाशा दिसेल आता पुढील प्रक्रिया करा
  • त्यानंतर तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करा.
  • आता गट नंबर सह तुम्ही जमिनीचा नकाशा डाऊनलोड करू शकता.
  • या प्रक्रियेच्या आधारे तुम्ही महाराष्ट्र (Bhu Nakasha Maharashtra) राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन तपासू शकता किंवा डाऊनलोड करू शकता.