Bhuleshwar Shiv Temple | आपल्या महाराष्ट्राला एक सांस्कृतिक आणि पर्यटन वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्रमध्ये अशी ठिकाण आहेत आणि वास्तू आहेत, ज्यांना पाहण्यासाठी अगदी देश-विदेशातून लोक भेट देत असतात. अनेक प्राचीन हिंदू मंदिर आहेत. ज्याचा शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तो जाणून घेण्यासाठी आणि या पर्यटनाचे सौंदर्य पाहण्यासाठी अनेक लोक येत असतात. सध्या श्रावण महिना चालू आहे. या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची मोठ्या प्रमाणात भक्ती केली जाते. अनेक लोक शंकराच्या मंदिरांना भेट देतात. आणि पूजा करत असतात. असेच पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यात एक भुलेश्वर शिवमंदिर (Bhuleshwar Shiv Temple) आहे. हे शिवमंदिर खूप प्रसिद्ध आहे. येथील वास्तू कलेसाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. वरून हे मंदिर अगदी एका मशिदी प्रमाणे दिसते. परंतु हे अत्यंत प्राचीन असे हिंदू मंदिर आहे. याला गोलाकार घुमट आहे. यांसारख्या गोष्टी असल्यामुळे ते मशिदी सारखे दिसते. मुघल स्थापत्य शैलीची यावर कला दिसत आहे. महाराष्ट्राच्या आगरी कानाकोपऱ्यातून या मंदिरात दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात.
शिव शंकराचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Shiv Temple) खूप प्रसिद्ध आहे. परंतु हे मंदिर म्हणजे मूळचा मंगलगड नावाचा एक किल्ला होता. औरंगजेब नेहमीच या ठिकाणी आक्रमण करत असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तेत मुस्लिम कामगारांनी या शिल्पाची बांधणी केलेली आहे. जे सध्या खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे मंदिराची ही वास्तू एका मशिदी प्रमाणे दिसते. या मंदिरात डाव्या सोंडेच्या आणि उजव्या सोंडेच्या विविध प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भुलेश्वर मंदिर हे एक असे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. ज्या ठिकाणी एका स्त्रीच्या पोशाखामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या गणपतीला गणेश्वरी, लंबोधरी किंवा गणेशयन या नावाने देखील ओळखले जाते.
या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या गर्भगुहात पाच शिवलिंगी आहेत. आणि ही शिवलिंगी एकाच खंदकात लपलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केवळ प्रकाश असतानाची शिवलिंग दिसू शकतात. आणि वर्षातून एक ते दोन वेळा त्या महादेवाच्या पिंडीवर सूर्यप्रकाश पडतो. हे मंदिर तेराव्या शतकात बांधले गेले, अशी माहिती आली आहे. 13 व्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक मंदिरे बांधली गेली होती. यावेळी हे मंदिर बांधले गेलेले आहे.
या मंदिरावर असलेले कोरीव काम तेथील वास्तुकला या सगळ्या गोष्टींसाठी हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पुण्यापासून केवळ 54 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते. पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचे असे हे मंदिर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेली कला आणि शिवलिंग पाहण्यासाठी लांबून लोक येत असतात.