कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी भूमी पेडणेकर आणि कपिल शर्माची हातमिळवणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर कोरोनाच्या दुसऱ्या प्रलयकारी लाटेत शक्य तितकी मदत करताना दिसत आहे. इतर कलाकारांप्रमाणे तिनेही स्वतःहून कोरोना विरुद्ध लढ्यात अविरत मदतीचा हात पुढे केला आहे. आता कर्नाटकमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना मदत करण्याच्या दृष्टीने कपिल शर्मासोबत तिने हातमिळवणी केली आहे. भूमीने ‘श्री श्री रवी शंकर यांच्या मिशन जिंदगी’ या उपक्रमातदेखील सहभाग घेतला आहे. या उपक्रमाद्वारे कपिलसोबत ती कर्नाटकातील गरजू लोकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमातून होसकोटे, देवानहळ्ळी, दोडाबल्लापूर, नेलमंगला-१ आणि नेलमंगला-२ येथील रूग्णालयांत असणाऱ्या गरजूंसाठी ऑक्सिजन बसदेखील नेण्यात येत आहेत.

https://www.instagram.com/p/COPlSyOhZcr/?utm_source=ig_web_copy_link

या संदर्भात बोलताना भूमी म्हणते कि, “सध्या आपल्या देशात विषाणूची दुसरी लाट जीवघेणी ठरते आहे. भारतातील ग्रामीण भागांतही या साथीचा मोठा तडाखा बसला आहे. छोटी शहरे आणि गावांमधून विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढल्याचे दिसते आहे. या ठिकाणी पुरेशा वैद्यकीय सुविधादेखील नाहीत, किंवा त्या मर्यादित आहेत. रुग्णांना प्राणवायू उपलब्ध करून देणे ही सध्या काळाची गरज आहे. ‘मिशन जिंदगी’च्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भारतावर लक्ष केंद्रित केले आहे आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांपासून मदतीची सुरुवात करत आहोत.”

https://www.instagram.com/p/CPTal3Ogf5I/?utm_source=ig_web_copy_link

पुढे म्हणाली, “आमच्या बसमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले आहेत. ज्या रुग्णांना बेडची गरज आहे व ज्यांना आपतकालीन स्थितीत जिल्ह्याबाहेर जावे लागते. त्या रुग्णांकरिता ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. छोट्या शहरांमध्ये केसचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांवर येणारा ताण या बस सुविधेमुळे कमी होईल. या अभियानाकरिता कपिलसोबत एकत्र काम करण्याची संधी माझ्यासाठी खरच आनंददायी आहे. अनेक गंभीर कोरोनाग्रस्त असणाऱ्या रुग्णांना याद्वारे मदत मिळते आहे. या सध्याच्या कठीण काळात गुरुदेव आशेचे किरण बनले आहेत. मी त्यांचे आभार मानते.”

https://www.instagram.com/p/CPTYEKFgVDP/?utm_source=ig_web_copy_link

या संदर्भात कपिल शर्मा म्हणतोय कि, “माणूस म्हणून सध्याच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. मी माझे योगदान देतो आहे. गुरुदेव आणि बीजेएस ( अर्थात, भारतीय जन संघटना )चे अद्वितीय कार्य सुरू आहे. त्यांच्यासमवेत काम करण्याची मिळालेली संधी माझ्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे. भूमी कोरोना काळातील मदत कार्यात अप्रतिम काम करत आहे. या उपक्रमा मार्फत मोबाईल ऑक्सिजन बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिक राज्यांमध्ये या बस पोहचविण्याची आमची योजना आहे.”

Leave a Comment