हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा त्याच्या स्विंग साठी ओळखला जातो. एकाच वेळी इन-स्विंग आणि आऊट-स्विंग करण्यात भुवी माहीर आहे. भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंगच्या बळावर भल्या भल्या फलंदाजांना नांगी टाकायला लावलं आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात भुवनेश्वर कुमारने आपल्या इन-स्विंगवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला (Sanju Samson) क्लीन बोल्ड केलं. याबाबतचा विडिओ सुद्धा समोर आला असून चाहत्यांना विंटेज भुवी पाहायला मिळाला.
सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २०१ धावांचा डोंगर उभारला.. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात राजस्थानला २ धक्के दिले. सर्वात आधी भुवीने जोस बटलरला मार्को जॉन्सनकरवी झेलबाद केलं. यानंतर ओव्हरच्या 5व्या चेंडूवर संजू सॅमसनचा अप्रतिम बोल्ड काढला . भुवनेश्वर कुमारचा अचंबित करणारा स्विंग पाहून मैदानावरील उपस्थित प्रेक्षक काहीकाळ स्तब्धच राहिले. सर्वाना जुना भुवी परत आल्याची भावना निर्माण झाली… भुवनेश्वरच्या घातक गोलंदाजीचा एक व्हिडिओही आयपीएलच्या वेबसाइटवर शेअर करण्यात आला आहे.
Vintage Bhuvneshwar Kumar 😍
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2024
A perfect inswinger to the #RR skipper as he strikes twice in the first over 🎯👌
Watch the match LIVE on @StarSportsIndia and @JioCinema 💻📱#TATAIPL | #SRHvRR | @SunRisers pic.twitter.com/cGcOprREFT
दरम्यान, कालच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अतिशय रोमांचक क्षणी जस्थान रॉयल्सवर १ धावेने निसटता विजय मिळवला. अंतिम षटकांत राजस्थानला जिंकण्यासाठी १३ धावांची गरज होती. रोमन पॉवेलसारखा आक्रमक फलंदाज समोर होता. मात्र तिथेही भुवनेश्वर कुमार हैद्राबादच्या मदतीला आला.. भुवीने टिच्चून गोलंदाजी करत राजस्थानला रोखले. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने ४ षटकात ४१ धावा देऊन ३ बळी मिळवले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.