कुत्र्यासोबतची फाईट बिबट्याला पडली महागात, दोघेही विहीरीत अडकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी | वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याचं प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्मान झाला आहे. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील बडेगाव येथे घडली आहे. गावकर्‍यांना एका विहीरीत बिबट्या पडल्याचे दिसल्याने बडेगाव व परिसरात एकच खळबळ उडाली.

हाती आलेल्या माहितीनुसार, जंगलातून एक बिबट्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत घुसला. यावेळी बडेगाव येथे बिबट्याची रात्रीच्या वेळी एका कुत्र्याशी झटापट झाली. त्यावेळी दोघंही विहीरीत पडले. विहीरीतून बिबट्याला वरती चढता न आल्याने तो अडकून बसला. सकाळी पाण्यासाठी गेलेल्या गावकर्‍यांना बिबट्या दिसताच त्यांनी वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यानंतर वन खात्याचे अधिकारी तातडीने तेथे गेले अाणि त्यांनी परिश्रम घेऊन बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले.

सकाळी सात वाजता वनखात्याच्या अधिकार्‍यांनी रेस्क्यू आॅपरेशन सुरु केले होते. अखेर अकरा वाजता बिबट्याला बाहेर काढण्यात वन खात्याला यश आले. योग्य तो औषधोपचार करुन बिबट्याला जंगलात सोडण्यात येणार आहे अशी माहिती वन अधिकार्‍यांनी दिली.

इतर महत्वाचे –

अवनी…!

ताडोबात पर्यटकांनी वाघिणीसह बछड्यांचा मार्ग रोखला

नरभक्षक “टी १” ला अखेर गोळ्या

भुकेने व्याकुळ बिबट्याचा आडात पडून मृत्यू

गिर राष्ट्रीय उद्यानात ११ सिंहांचा संशयास्पद मृत्यू

Leave a Comment