सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील जिल्हा समजला जातो. मात्र, याच जिल्ह्यात मुलींना शिक्षणासाठी रोज अनेक किलोमीटर चा प्रवास करावा लागतो. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावातील मुलींना शिक्षणासाठी रोज किमान 8 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे. या प्रवासात अनेक समस्यांना मुलींना सामोरं जावं लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून गावचे सरपंच यांनी त्यांच्या कल्पकतेतून मुलींसाठी सायकल बँक साकारली.
बिचुकले गावातील मुलींना शिक्षणासाठी रोज देऊर या गावापर्यंन्त पायपीठं करत जावं लागत. रोज मुलींसमोर असणारं हे आव्हान ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने संपुष्ठात आल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीने सायकल बँक स्थापन करत शिक्षणासाठी जाणा-या मुलींना सायकल उपलब्ध करुन देत त्यांची समस्या दूर केली. गावातील मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावात जात असताना प्रचंड त्रास व्हायचा, दुस-यांना लिप्ट मागुन घरापर्यन्त पोहोचावं लागत होत.
काही महिण्यांपुर्वी एक मुलगी लिप्ट मागुन येताना अपघातात मरण पावली होती. यानंतर आम्ही मुलींच्या सुरक्षेचा विचार करत, त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे. याकरीता सायकल बँक स्थापन करत ग्रामपंचायतीने त्यांना सायकल पुरवल्या आहेत. मुधाई देवी हायस्कुल देऊर मध्ये सुमारे 24 गावांतून विद्यार्थी येतात. यातील बहुतेक गावातील मुलींना आणि विद्यार्थ्यांना दळणवळनाचं साधन उपलब्ध नाही. यामुळं बिचुकले गावानं केलेला सायकल बँकेचा उपक्रम इतरांनी सुद्धा आत्मसात केला पाहिजे, असं शाळेचे प्राचार्य नितीन भंडारी यांनी सांगितल.