आयुक्त पांडेय यांची सायकल सवारी ; सायकल चालवत पोहचले महानगरपालिकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे ‘ सायकल टू वर्क डे ‘ या संकल्पनेनुसार आज सायकलवर कार्यालयात पोहोचले. आपल्या दिल्ली गेटवरील जलश्री या निवासस्थानावरुन सायकलवर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. येथील एक बैठकीत ते उपस्थित होते. बैठक संपल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय ते औरंगाबाद महानगरपालिका मुख्यालय, टाऊन हॉलपर्यंत पांडेय यांनी सायकलवर प्रवास केला.

सायकल्स फॉर चेंज या मोहिमे अंतर्गत प्रशासकांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सायकलवर कार्यालयात येण्याची सूचना केली होती.त्यानुसार शहर अभियंता सखाराम पानझडे, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, अतिरिक्त आयुक्त-१ बी बी नेमाने, अतिरिक्त आयुक्त-२, रवींद्र निकम,उपायुक्त अपर्णा थेटे,मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सायकलवर कार्यालय गाठले. पांडेय यांनी अकोला जिल्हाधिकारी असताना देखील हा प्रयोग यशस्वीरीत्या अमलात आणला होता.औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे मागच्या महिन्यात ‘ सायकल्स फॉर चेंज ‘ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पांडेय यांनी सायकल प्रेमींसाठी स्वतंत्र लेन बनवणार असल्याची घोषणा केली होती. पर्यावरणाप्रती आपण सर्वांनी जागरुक राहायला हवे असेही ते म्हणाले होते. त्यामुळे आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला आयुक्तांसह सर्व अधिकारी वर्ग सायकलवर कार्यालयात येतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment