काळ आला होता पण वेळ आली नव्हती ; आयपीएस अधिकाऱ्यांना नेणारी बोटचं उलटली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएस अधिकाऱ्यांना बडी झील येथे बोटीने घेऊन जात असताना अचानक बोट उलटली. या अपघातात ८ जणांना वाचविण्यात आले. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये हा मोठा अपघात टळला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या बोटीमध्ये आयपीएस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसह ८ जण होते. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या रक्षकाच्या दक्षतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले. आयपीएस मीट वॉटर स्पोर्ट्स इव्हेंटदरम्यान बोट तलावात बुडाली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की आयपीएस अधिकाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय या बोटीत बसले होते. सुरक्षा मार्गदर्शकाच्या सूचनांनुसार अधिकाऱ्यांनी लाइफ जॅकेट घातले होते, असे सांगण्यात येत आहे. यामुळे सर्वांना तलावाच्या बाहेर सुखरुप बाहेर काढण्यात आले. भोपाळमध्ये आयपीएस कॉन्क्लेव सुरू आहे. गुरुवारी या दोन दिवसांच्या संमेलनाचा शेवटचा दिवस होता. यावेळी पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबीय खेळाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडले होते. आयपीएस अधिकारी आणि त्याचे कुटुंब बोटिंगचा आनंद घेत होते. दरम्यान, बोट कलंडली. त्या सर्वांनी लाइफ जॅकेट घातली होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

Leave a Comment