मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात, दोन जण ठार

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर बोर घाटात तीव्र उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक ने डोंगराला जोरदार धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जाणारा ट्रक बोर घाटातून नो एंट्री मार्गे जात असताना खिंडीजवळील तीव्र उतारावर चालकाचा ट्रक वरील ताबा अचानक सुटला त्यामुळे ट्रकने खिंडीच्या डोंगराला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकमधील दोघे जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून तिघेजण ट्रक मधेच अडकले होते त्यापैकी एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव यंत्रणेला यश आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

अपघात झाला असल्याची माहिती कळतात महामार्ग पोलिस, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी व्यक्तीला ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील दोन मृत व्यक्तींचे ओळख पटवण्याचे काम सुरू असून. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. महामार्गावरील ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like