पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, आता LPG गॅस कनेक्शन ऍड्रेस प्रूफशिवायही मिळणार; त्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हाला LPG कनेक्शन घ्यायचे असेल तर आता हे काम अगदी सहजपणे होईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ऍड्रेस प्रूफची गरज भासणार नाही. खरं तर, उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,”आता माझ्या कामगार सहकाऱ्यांना पत्त्याच्या पुराव्यासाठी इकडे -तिकडे भटकण्याची गरज नाही. पत्ता नसतानाही तुम्हाला तुमच्या पत्त्यावर गॅस कनेक्शन मिळेल.”

5 कोटी महिलांना LPG कनेक्शन देण्याचे लक्ष्य
2016 मध्ये जेव्हा उज्ज्वला 1.0 लाँच करण्यात आले, तेव्हा दारिद्र्य रेषेखालील (BPL) 5 कोटी महिलांना LPG कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना घरगुती स्वयंपाक गॅस (LPG) कनेक्शन देते. ही योजना पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या सहकार्याने चालवली जात आहे.

पत्त्याच्या पुराव्याशिवाय गॅस कनेक्शन कसे मिळवायचे ते जाणून घ्या
>> या योजनेअंतर्गत तुम्ही घरबसल्या LPG कनेक्शनसाठी अर्ज करू शकता.
>> अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
>> अर्जदाराचे बँक खाते आणि दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असावे.
>> जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://www.pmuy.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
>> यानंतर, ऑनलाईन अर्जाचा पर्याय निवडून, तुम्हाला कोणत्या कंपनीला गॅस कनेक्शन घ्यायचे आहे ते निवडावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती भरून सबमिट करावे लागेल.
>> ऑफलाइन अर्जासाठी, तुम्ही वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करू शकता आणि तो भरून जवळच्या गॅस एजन्सी डीलरकडे सबमिट करू शकता.
>> पत्त्याच्या पुराव्यासाठी, तुम्हाला तुमच्या पत्त्याचे फक्त एक सेल्फ डिक्लेरेशन द्यावे लागेल आणि तुम्हाला गॅस कनेक्शन मिळेल.

लाभार्थींना या सुविधा मिळतील
उज्ज्वला 2.0 अंतर्गत, लाभार्थ्यांना डिपॉझिट फ्री एलपीजी कनेक्शनसह पहिले रिफिल आणि हॉटप्लेट मोफत दिले जाईल. तसेच, रजिस्ट्रेशन साठी किमान कागदपत्रांची आवश्यकता असेल.

सरकार 1600 रुपयांची मदत देते
याशिवाय, BPL कुटुंबांना एका एलपीजी कनेक्शनसाठी 1600 रुपयांची आर्थिक मदत देखील दिली जाते. मात्र, लाभार्थ्यांना स्टोव्ह स्वतः विकत घ्यावा लागतो. योजनेनुसार लाभार्थ्यांना 14.2 किलो LPG सिलेंडर दिले जाते. त्याची किंमत सुमारे 3200 रुपये आहे. यावर 1600 रुपये सबसिडी उपलब्ध आहे तर OMCs ला 1600 रुपये ऍडव्हान्स मिळतात.

Leave a Comment