‘जो’ भाऊ अन् ‘कमला’ अक्का तुमचं हार्दिक अभिनंदन! पुण्यातला ‘तो’ धमाल बॅनर ठरतोय आकर्षण

पुणे । डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अलिकडेच जो बायडेन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तसेच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बायडेन यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांची निवड झाली. भारतीयांसाठी ही कामगिरी नक्कीच अभिमानास्पद होती.

याच गोष्टीचा अभिमान बाळगत पुण्यात याचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले आहे. धनकवडी परिसरात जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारा व अभिनंदनपर असा भला मोठा बॅनर झळकला आहे. आणि तो जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ समोर कमला हॅरिस आणि भारतीय वंशाच्या १२ मंत्र्यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक झळकला आहे. आणि हा फलक ज्या व्यक्तीने लावला त्यांचे नाव आहे पोपटराव खोपडे. खोपडे यांनी लावलेल्या फ्लेक्स येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आकर्षणाचे कारण ठरले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like