दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकजण ठार

कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील साई मंगल कार्यालयासमोर दुचाकीची समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये एकजण जागीच ठार झाल्याची घटना दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. तर एकजण गंभीर जखमी झाला.रामचंद्र शेटे (वय 49, रा. येळगाव, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. जखमीचे नाव समजू शकले नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मयत रामचंद्र शेटे हे सोमवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून कराडकडे येत होते. पाचवड फाटा येथील साई मंगल कार्यालयासमोर त्यांची समोरून आलेल्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये रामचंद्र शेटे हे जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला.

जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून रात्री उशिरा कराड ग्रामीण पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like