हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यामध्ये दगड फोडण्यासाठी जिलेटिनच्या काड्या घेऊन चाललेल्या ट्रकचा मोठा विस्पोट झाला. आणि या स्फोटामुळे आठ लोकांचा मृत्यू झाला. हा स्फोट झाल्यानंतर आसपासचा परिसर मोठ्या प्रमाणात हादरला गेला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. आणि या स्फोटामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या परिजनांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कर्नाटका शासनाने जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या दुर्घटने विषयी हळहळ व्यक्त करणारे ट्विट केले आहे. घायाळ झालेल्या लोकांना आणि मृत व्यक्तीच्या परिवाराला मोदी यांनी ट्विट मधून आधार दिला आहे.
यासोबतच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या रिपोर्टनंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे येडियुरप्पा माध्यमांशी बोलताना म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’