गौतम अदानी यांना मोठा फटका, हजारो कोटींच्या तीन परदेशी फंडांची खाती गोठविली; कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली घसरण*

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund या तीन परदेशी फंडांची खाती गोठविली आहेत. भारत आणि आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अदानी ग्रुप साठी हि बातमी टेन्शन वाढवणारी ठरली आहे.

या परकीय फंडाचे अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांमध्ये 43,500 कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत. NSDL च्या वेबसाइटनुसार, ही खाती 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी गोठविली गेली होती. या बातमीनंतर भारतीय शेअर बाजारामध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. या बातमीनंतर अदानीच्या 6 पैकी 5 कंपन्यांमध्ये लोअर सर्किट सुरू झाले.

या तिघांचाही अदानी एंटरप्रायजेसमध्ये 6.82 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 8.03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के आणि अदानी ग्रीनमध्ये 3.58 टक्के हिस्सा आहे. कस्टोडियन बँका आणि परदेशी गुंतवणूकदार हाताळणार्‍या कायदा संस्थांनुसार या विदेशी फंडांमध्ये beneficial ownership ची संपूर्ण माहिती दिलेली असू शकत नाही. यामुळे त्यांची खाती गोठविली गेली आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत बेनिफिशियल ऑनरशिपची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.

खाती गोठवण्याचा अर्थ काय?
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सहसा कस्टोडियन आपल्या ग्राहकांना अशा कारवाईबद्दल चेतावणी देतात, परंतु जर फंडस् याला प्रतिसाद देत नसेल किंवा त्याचे पालन करत नसेल तर खाती गोठविली जाऊ शकतात. खाती गोठवण्याचा अर्थ असा आहे की, फंडस् कोणत्याही विद्यमान सिक्युरिटीज विकू शकत नाही किंवा नवीन खरेदी करू शकत नाही.

यासंदर्भात NSDL, SEBI आणि अदानी ग्रुपला पाठवलेल्या ईमेलला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund शी संपर्क होऊ शकलला नाही. हे तिन्ही फंडस् SEBI कडे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणून रजिस्टर्ड आहेत आणि मॉरिशसच्या बाहेर काम करतात. हे तिघेही पोर्ट लुईसमधील एकाच पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत आणि त्यांची वेबसाइटही नाही.

शेअर्सच्या किंमतींमध्ये फेरफार करण्यात येत आहे
2019 मध्ये कॅपिटल मार्केट्स रेग्युलेटरने PMLA नुसार FPI साठी KYC डॉक्युमेंटेशन बनविले. 2020 पर्यंत नव्या नियमांचे पालन करण्यासाठी फंडही देण्यात आला. सेबीने सांगितले की,” नवीन नियमांचे पालन न करणाऱ्या फंडस् ची खाती गोठविली जातील. नवीन नियमांनुसार FPI ना काही अतिरिक्त माहिती द्यावी लागली. यामध्ये कॉमन ऑनरशिप जाहीर करणे आणि फंड मॅनेजर्स सारख्या प्रमुख कर्मचार्‍यांचे पर्सनल डिटेल यांचा समावेश आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment