आधार संबंधी केंद्राचा मोठा निर्णय! आधार कार्ड वरील माहिती अपडेट करणे आता ‘इतके’ सोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे.सध्या ही केंद्रे लॉकडाऊनमुळे बंद आहेत.ज्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.आता मात्र तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून आपले आधार कार्ड अपडेट करू शकाल.यूआयडीएआयने सुमारे २० हजार सामान्य सेवा केंद्रांना आधार अपडेट्स करण्याची परवानगी दिली आहे.या सर्व केंद्रांवर आधार अपडेटची यंत्रणा सुरु करण्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे.

नाव, जेंडर आणि वय बदलण्याची सुविधा मिळेल
यूआयडीएआयने माहिती दिली की आता कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे आपले आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकते.येथे केवळ डेमोग्राफिक डेटाच अपडेट करण्याच्या सुविधेस परवानगी मिळाली आहे. म्हणजेच, केंद्र संचालक आणि आधार वापरकर्त्यांची ओळख ही फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांच्या बाहुल्याद्वारे केली जाईल.मुलांचे बायोमेट्रिक्स तपशील सीएससीसह अपडेट केले जातील आणि पत्त्यातील बदल करणे देखील शक्य होतील.युआयडीएआयने सांगितले की ही प्रणाली जूनच्या अखेर पर्यंत तयार होईल.मुलांचे बायोमेट्रिक्स तपशील सामान्य सेवा केंद्रांमध्ये देखील अपडेट केले जातील तसेच पत्ता देखील बदलला जाईल. देशभरात २.७४ लाखाहून अधिक केंद्रे कार्यरत असून ग्रामीण भागात विविध प्रकारच्या सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे.

सीएससी व्यतिरिक्त इतर अनेक ठिकाणांहून आधार कार्ड अपडेट केले जाऊ शकतात
सीएससी व्यतिरिक्त लोक बँकांच्या शाखा, टपाल कार्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्येही यूआयडीएआयच्या मान्यताप्राप्त केंद्रांमध्ये आधाशी-जोडल्या गेलेल्या सेवा मिळवू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment