राज्य सरकारचा मोठा निर्णय : आता ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना टोल माफी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वाढत्या करोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची निकडही वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरात द्रवरूप ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन सिलिंडर राज्यात येणार आहेत. अन्य राज्यातून येणाऱ्या ऑक्सिजनचा साठा विथाअडथळा विविध शहरात पोहोचावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला असून या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोना संकटात औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनची तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अन्य राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. मात्र, यात वाहतूक आणि प्रवासाला लागणार वेळ ही मुख्य समस्या आहे. यासाठीच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

परराज्यातून येणारी तसंच राज्यांतर्गंत ऑक्सिजन वाहन गाड्यांची वेगवान वाहतूक होऊन सर्वसामान्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावा यासाठी सरकारने ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागानं काढले आहेत. यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या गाड्यांचा टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment