मोठा निर्णय! खासगी बँकांना सरकारी व्यवसाय करण्यास मिळणार सूट, आता कसा फायदा होईल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अर्थमंत्री सीतारमण यांनी खासगी बँकांसाठी मोठी घोषणा केली आहे. शासनाने खासगी बँकांना शासकीय बँकिंग व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे, अर्थात आतापासून खासगी बँका देखील सरकारी व्यवसायासाठी अर्ज करु शकतील. सीतारामन यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. आतापासून खासगी बँका देखील टॅक्स, पेन्शन, पेमेंट इत्यादी सरकारी व्यवहारात भाग घेऊ शकतील. यामुळे खासगी बँकांचे क्रेडिट आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी वाढतील.

FM सीतारमण यांनी ट्विट केले
अर्थमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, सरकारी व्यवसाय खाजगी क्षेत्रातील बँकांच्या मंजुरीवरून ही बंदी उठविण्यात आली आहे. सरकारी बिझनेस मिळवण्यासाठी आता सर्व बँका भाग घेऊ शकतील.

पूर्वी काही बँकांमध्ये ही सुविधा होती
यापूर्वी खासगी क्षेत्रातील काही बँकांमध्येच ही सुविधा दिली जात होती, परंतु आतापासून सर्व बँका या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यामुळे खासगी बँकांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ होईल. याशिवाय ग्राहकांना देखील चांगल्या सुविधा मिळतील.

DFS ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, सरकारने यापूर्वी काही खासगी बँकांना परवानगी दिली होती. आता खासगी बँकांना शासकीय व्यवसायात भाग घेण्याची परवानगी दिल्यानंतर ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील, स्पर्धा वाढेल आणि कस्टमर सर्विसेजची मानके आणखी चांगले होतील अशी अपेक्षा आहे.

सरकारी योजनांचा विस्तार होईल
सरकारच्या या निर्णयामुळे समाजकल्याण योजनांचाही विस्तार होणार आहे. त्याशिवाय टॅक्स कलेक्शन, महसूल संबंधित व्यवहार, निवृत्तीवेतनाची रक्कम (Pension Payments) आणि किसान बचत पत्र या छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes) खासगी बँकांमार्फतही गुंतवणूक करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment