वाल्मीक कराडच्या जीवाला धोका; न्यायालयाकडे केली मोठी मागणी

walmik karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे आक्रोशाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड हा कोठडीत शिक्षा भोगत आहे. परंतु वाल्मीक कराडला (Walmik Karad) कोठडीत अनेक चांगल्या सुविधा पुरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप विरोधांकडून केला जात आहे. अशातच, कराडने आपल्याला गंभीर असल्याचे सांगत मदतनीसची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराडने सांगितले आहे की आपल्याला स्लिप एपनिया नावाचा आजार आहे. त्यामुळे ऑटो सीपॅप नावाची मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून त्याला देण्यात आला आहे. म्हणूनच ही मशीन चालवण्यासाठी आपल्याला कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्यात यावी, अशी मागणी वाल्मिक कराडने केली आहे. याबाबत त्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

इतकेच नव्हे तर, ही मशीन चालवण्याचे प्रशिक्षण रोहित कांबळेने घेतले असून मशीन जर चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आली तर जीवाला धोका होऊ शकतो असे वाल्मीक कराडने आपल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळेच आता या याचिकेवर न्यायालय कोणता निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.