सोन्या चांदीच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. मात्र आज ही वाढ रोखली गेली आहे. सोने आणि चांदी दोन्हींच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. सकाळी १० च्या आसपास मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX)मध्ये सोन्याचा दर ४७ हजार ०८२ रुपय प्रती १० ग्रॅम वर आला. गुरुवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX)वर सोन्याचा भाव ८०० रुपयांनी तेजीत होता.

रुपयाची किंमत घसरला असल्याने त्याचा परिणाम दरावर झाला असल्याचे माहितगारांनी सांगितले. सराफा बाजारात देखील आज सोन्याच्या किंमतीत १० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. मुंबई २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६ हजार ११० रुपये झाला आहे. गुरुवारी तो ४६ हजार १०० रुपये होता. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ४७ हजार ११० रुपये झाला आहे. त्यात आज १० रुपयांची वाढ झाली. चांदीसुद्धा १० रुपयांनी महागली आहे. चांदीचा भाव किलोला ४८ हजार ५१० रुपये झाला आहे. गुरुवारी चांदीचा भाव ४८, हजार ५०० रुपये होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. अमेरिकी डॉलर मजबूत झाल्याने तसेच रुपया घसरल्याने विदेशी बाजारपेठेत सोन्याचा दर १ हजार ७२७.२४ डॉलर इतका होता. तर चांदीचे दर ०.४ टक्क्यांनी घसरले आहेत ते १७.६४ डॉलर झाले आहेत.  मार्च महिन्यापासून विदेशी बाजारपेठेत सोन्याच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment