हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस मध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकाला नुसार भाजप 32 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 30 जागांवर आघाडी वर आहे.
उत्तराखंड मध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहेत. त्यातच आत्तापर्यंत आलेल्या हाती आलेल्या 64 जागांच्या निकाला नुसार भाजप 32, तर काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहेत. आम आदमी पार्टी 1 तर इतर 1 आघाडीवर आहेत.
तर आत्तापर्यंत हाती आलेल्या 5 राज्यांच्या निवडणूक निकालात भाजप आघाडीवर दिसत आहे. उत्तरप्रदेशात भाजपने 200 जागांचा टप्पा पूर्ण केला असून बहुमता कडे जोरदार वाटचाल सुरू आहे. तर गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पंजाब मध्ये आप ने सर्वांचा सुपडा साफ करत बहुमता कडे वाटचाल केली आहे